वेल्ह्यात ९३ जागांसाठी १९९ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:05+5:302021-01-08T04:31:05+5:30

मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९३ जागांसाठी १९९ उमेदवार रिंगणात आहेत, तर ...

199 candidates in fray for 93 seats in Velha | वेल्ह्यात ९३ जागांसाठी १९९ उमेदवार रिंगणात

वेल्ह्यात ९३ जागांसाठी १९९ उमेदवार रिंगणात

मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ९३ जागांसाठी १९९ उमेदवार

रिंगणात आहेत, तर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

विंझर,मार्गासनी

वेल्हे बुद्रुकमधील एक जागेसाठी, अंत्रोली, वांजळे, पाबे, आंबेड, निगडे बुद्रुक आदी ठिकाणी चुरशीच्या लढती होणार हे आता

स्पष्ट झाले आहे.

वेल्हे तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २२७ जागांसाठी निवडणुका होणार होत्या त्यापैकी

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून १२४ जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर २० ग्रामपंचायतीमधील

९३ जागांसाठी १९९ जण रिंगणात आले आहेत. तालुक्यातील घोल, कातवडी, खरीव, मांगदरी, मेटपिलावरे, निवी गेव्हंडे, कोळवडी, निगडे मोसे,

वांगणी, वांगणीवाडी, रुळे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आणि कोदवडी, वरसगाव, साखर, लाशिरगाव, निगडे बुद्रुक करंजावणे,वेल्हे बुद्रुक

मेरावणे, ओसाडे, आंबेड, खामगाव, घिसर, अंत्रोली, वांजळे, मालवली, विंझर, मार्गासनी, रांजणे, हिरपोडी, पाबे आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या

आहेत. विंझर,मार्गासनी वेल्हे बुद्रुकमधील एक जागेसाठी, अंत्रोली, वांजळे, पाबे, आंबेड, निगडे बुद्रुक आदी ठिकाणी चुरशीच्या लढती होणार हे आता

स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Web Title: 199 candidates in fray for 93 seats in Velha