अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:27 IST2024-04-08T18:27:27+5:302024-04-08T18:27:58+5:30

तिघे एका दुचाकीवरून रात्री घरी येताना भोरवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली

19 year old killed in hit and run by unknown vehicle Incident on Pune Nashik Highway | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे नाशिक महामार्गावरील घटना

अवसरी : पुणे नाशिक महामार्गावरून रात्रीच्या वेळी घरी येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वरील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.  तर दोघेजण जखमी झाले आहेत. प्रमोद नवनाथ इंदोरे वय १९असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश अनिल शिंदे व जयेश बाळू शिंदे ( सर्व रा.अवसरी खुर्द इंदोरेवाडी ता. आंबेगाव ) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रमोद नवनाथ इंदोरे, यश अनिल शिंदे, व जयेश बाळू शिंदे हे गुळानी ता. खेड येथे यात्रा असल्याने यश अनिल शिंदे यांच्या दुचाकीवरून रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गुळाणी येथे गेले होते. रात्री घरी येत असताना २:१५ वाजताच्या सुमारास भोरवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात प्रमोद इंदोरे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत मनोज इंदोरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नंदकुमार आढारी पुढील तपास करत आहे.

Web Title: 19 year old killed in hit and run by unknown vehicle Incident on Pune Nashik Highway