शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महागणपतीला १५१ डझन डाळिंबांचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांजणगाव गणपती : विनायक चतुर्थीनिमित्त श्री महागणपतीला १५१ डझन डाळिंबांचा नैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रांजणगाव गणपती : विनायक चतुर्थीनिमित्त श्री महागणपतीला १५१ डझन डाळिंबांचा नैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

विनायक चतुर्थी, शेषात्मज गणेशजयंती तथा श्रीशेषात्मज जन्मोत्सव निमित्ताने

अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.

दर वर्षी श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जन्मोत्सव साजरा करताना श्रीगणेश ग्रंथ पारायण, श्रीगणेश प्रवचन व कीर्तन सप्ताह, ज्येष्ठी श्रीगणेश जन्मोत्सव, महागणपती विवाह सोहळा साजरा केला जातो. परंतु कोरोना विषाणूच्या संकटामुळे श्री महागणपती मंदिर, रांजणगाव भाविकांसाठी शासनाच्या आदेशानुसार बंद आहे. यामुळे सोमवारी विनायकी चतुर्थी शेषात्मज गणेश जयंती तथा श्रीशेषात्मज जन्मोत्सवाचे निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

गणेशभक्त पंढरीनाथ विठोबा फलके ( शिरूर) यांसकडून विनायकी चतुर्थीनिमित्त महागणपतीस १५१ डझन डाळिंबांचा महानैवेद्य व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून ‘श्री’ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. त्या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ ॲड. विजयराज दरेकर, डॅा. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशेबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

फोटो:रांजणगाव येथील श्री महागणपतीला डाळिंब फळांचा नैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.