लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याला १५ लाखांना गंडा; राजस्थानच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:55 PM2021-06-24T19:55:30+5:302021-06-24T19:56:04+5:30

फिर्यादी हे संगणक अभियंता असून लॅपटॉप विक्रीबरोबरच ते दुरस्तीचा व्यवसाय करतात.

15 lakh fraud with computer engineer under the pretext of selling laptops; Crime filed against Rajasthan मर्चंट | लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याला १५ लाखांना गंडा; राजस्थानच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याला १५ लाखांना गंडा; राजस्थानच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Next

लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने संगणक अभियंत्याची १५ लाखांची फसवणूक

पुणे : लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने एका संगणक अभियंत्याला १५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी केतन सुनिल पळशीकर (वय ३६, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन भरत निलेश कुमार (वय २६, रा. रोपसी जालोर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ मार्च २०२१पासून आतापर्यंत घडला आहे.

फिर्यादी केतन पळशीकर हे संगणक अभियंता असून लॅपटॉप विक्रीबरोबरच ते दुरस्तीचा व्यवसाय करतात. भरत कुमार हा घाऊक लॅपटॉप विक्री करतो. त्यातूनच त्यांच्या आर्थिक व्यवहार झाला होता. सुरुवातीला फिर्यादींनी आरोपीला आरटीजीएस द्वारे ५ लाख रुपये दिले. त्यानंतर आणखी १० लाख रुपये दिले. असे एकूण १५ लाख रुपये भरत कुमारला दिले. मात्र, ठरल्याप्रमाणे त्याने फिर्यादींना लॅपटॉप दिले नाहीत. याबाबत फिर्यादीने तक्रार अर्ज विश्रामबाग पोलिसांकडे दिला होता. त्यांच्या अर्जाची पडताळणी करुन पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 15 lakh fraud with computer engineer under the pretext of selling laptops; Crime filed against Rajasthan मर्चंट

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app