शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीच्या आमिषाने १५ कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंतविलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गुंतविलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज भागचंद छल्लाणी (रा. ओमशांती, रघुवीर सोसायटी, मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याने किमान १५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी रिचर्ड अंची (वय ५८, रा. भोसलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नाेव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०२१ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, छल्लाणी याचे पुणे -सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीजवळील टाईम केअर बिल्डिंग येथे कार्यालय आहे. छल्लाणी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत असतो. अंची व त्यांच्या पत्नीने त्याच्याकडे नोव्हेंबर २०१४ मध्ये ६५ लाख रुपये गुंतवले. मार्च २०१८ मध्ये ठेव रक्कम व त्यावरील व्याज तो परत देणार होता. परंतु, अंची व इतरांनी अनेकदा मागणी करुनही छल्लाणी याने त्यांचे पैसे परत केले नाही.

शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी छल्लाणी याला अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांनी सांगितले की, छल्लाणी हा अनेक वर्षांपासून लोकांकडून पैसे घेऊन ते प्रॉपर्टीत गुंतवणूक करीत असे. त्यातून येणाऱ्या नफ्यातून लोकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवत असे. मात्र, त्याने २०१८ पासून लोकांचे पैसे देणे बंद केल्याने लोकांनी तक्रार केली. आतापर्यंत ३५ तक्रारी आल्या असून त्यात फसवणूक झाल्याची रक्कम जवळपास १५ कोटी रुपयांइतकी आहे. आणखी तक्रारी येण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा वाढू शकतो.