खुटबाव ग्रामपंचायतीच्या १३ जागा बिनविरोध.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:45+5:302021-01-08T04:30:45+5:30

केडगाव : खुटबाव ग्रामपंचायतीच्या १५ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे खुटबाव गाव ...

13 seats of Khutbaw Gram Panchayat unopposed. | खुटबाव ग्रामपंचायतीच्या १३ जागा बिनविरोध.

खुटबाव ग्रामपंचायतीच्या १३ जागा बिनविरोध.

केडगाव : खुटबाव ग्रामपंचायतीच्या १५ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे खुटबाव गाव आहे. गावामध्ये थोरात समर्थकांच्या दोन जागांवरती मैत्रीपूर्ण लढती रंगणार आहेत. या निवडणुकीमुळे बिनविरोध निवडणूक करण्याच्या परंपरेला अंशतः यश आले आहे. विशेष म्हणजे निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार राहुल कुल गटाने साहाय्य केले आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, भाऊसाहेब ढमढेरे, शिवाजी थोरात, नानासाहेब थोरात, दशरथ थोरात, संजय थोरात, अरुण थोरात, जी. के. थोरात, सुदाम थोरात, नवनाथ थोरात, दिगंबर थोरात, आर. डी. थोरात, संतोष थोरात, शरद शेलार, कोंडीबा थोरात, चेतन थोरात, शिवदास थोरात, अशोक पवार यांनी भूमिका बजावली. बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे- प्रभाग 1-स्वप्निल बाळासो चव्हाण. प्रभाग 2-राजेंद्र दत्तोबा थोरात, कलावती अविनाश चव्हाण, कोमल किरण थोरात. प्रभाग 3-निखिल मच्छिंद्र थोरात, सीमा दत्तात्रय शेलार, नाना पोपट डोमाळे. प्रभाग 4-मीना गणेश शितोळे, रघुनाथ ज्ञानदेव फणसे, सिंधुताई बाळासाहेब थोरात. प्रभात 5-पुष्पा प्रकाश सकट.

Web Title: 13 seats of Khutbaw Gram Panchayat unopposed.