Video: स्वारगेटच्या आरोपीला पकडण्यासाठी शिरूरमध्ये १०० पोलिसांचा ताफा; ऊसाच्या शेतातही शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:46 IST2025-02-27T17:46:34+5:302025-02-27T17:46:51+5:30
तब्बल ५० पेक्षा जास्त तास होऊनही आरोपीचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही

Video: स्वारगेटच्या आरोपीला पकडण्यासाठी शिरूरमध्ये १०० पोलिसांचा ताफा; ऊसाच्या शेतातही शोध सुरु
पुणे: स्वारगेट बसस्टॅन्डमध्ये शिवशाही बसमध्येच तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता फास आवळला आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे यांनी थेट आपले गाव गाठले अशी माहिती आता समोर आली आहे. सीसीटीव्ही तपासातूनही पोलिसांच्या हाती या संदर्भातली काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांची पथकं आरोपी दत्ता गाडेचे गाव गुनाट या गावात जाऊन पोहोचले आहे. गुनाट हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपी दत्ता गाडे याच्याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. याच गावातल्या एका घरात आरोपी शेवटचा दिसला असल्याची माहिती आता समोर आली आहे.
तब्बल ५० पेक्षा जास्त तास होऊनही आरोपीचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. आता शिरूर तालुक्यात थेट १०० पोलिसांच्या ताफ्याची गाडी दाखल झाली आहे. आरोपी गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उसाच्या शेतातही पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे. गाडेला शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हानच राहिले आहे.
स्वारगेटच्या आरोपीला पकडण्यासाठी शिरूरमध्ये १०० पोलिसांचा ताफा#Pune#Police#shirur#swargatepic.twitter.com/t3P6X78BEr
— Lokmat (@lokmat) February 27, 2025
ज्या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे याला शेवटचं पाहिलं होतं. इतकच नाही तर याच घरात आरोपीने पाणी देखील प्यायला असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं आधीच रवाना करण्यात आली आहे. यातील काही पथक आरोपीच्या गुणाट या गावात ठाण मांडून बसली आहेत. या गावातील प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातो. पोलिसांच्या मदतीला श्वानपथक देखील आहे. या पथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचं काम पोलीस करताना दिसतात.