Pune Porsche Accident: पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं?

By नितीश गोवंडे | Updated: May 19, 2025 14:03 IST2025-05-19T14:01:35+5:302025-05-19T14:03:53+5:30

मुलाची आई शिवानी अगरवालला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिमजामीन देण्यात आला तरी रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे

1 year has passed since the Porsche accident 9 accused including the father are still in jail what exactly happened in the year? | Pune Porsche Accident: पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं?

Pune Porsche Accident: पोर्शे अपघाताला १ वर्ष पूर्ण; बड्या बापासहीत ९ आरोपी जेलमध्येच, वर्षभरात नेमकं काय घडलं?

नितीश गोवंडे

पुणे: कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणाला रविवारी (दि. १८) एक वर्ष पूर्ण झाले. बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कार चालवत दुचाकीस्वार दोघांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात संगणक अभियंता असलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेनंतर पुणेपोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या अपघाताची माहिती वरिष्ठांना न देणे, एका तत्कालीन स्थानिक आमदाराची पोलिस ठाण्यात लुडबुड, अल्पवयीन मुलाची पोलीस ठाण्यात पिझ्झा पार्टी. मात्र, वरिष्ठांना या घटनेची माहिती होताच या प्रकरणी पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दहा जणांना अटक केली होती. त्यातील नऊ आरोपी आजही जेलमध्ये आहेत. या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा श्रीमंत बाप आणि आजोबा यांचादेखील समावेश आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे हे काम करीत आहेत.

ही टोळी अजूनही जेलमध्ये..

गेल्या वर्षभरापासून पोलिसांनी केलेल्या अत्यंत प्रभावी तपासामुळे व न्यायालयात योग्य बाजू मांडल्यामुळे विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवाल, अश्पाक मकानदार, आशिष मित्तल, अमर गायकवाड, आदित्य सूद, अरुणकुमार सिंग यांच्यासह ससूनचे श्रीहरी हाळनोर, अजय तावरे आणि अतुल घटकांबळे ही मुलाला वाचवण्यासाठी काम करणारी टोळी अजूनही जेलमध्येच आहे. शिवानी अगरवाल हिला २३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन देण्यात आला. हा जामीन देखील रद्द करण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला असून, त्यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे.

वर्षभरात नेमके काय झाले यावर एक नजर..

१९ मे - भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू २० मे - मद्यपान करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला बाल न्याय मंडळाकडून जामीन
२१ मे - विशाल अगरवाल, नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नीतेश शेवानी आणि जयेश गावकर यांना अटक
२२ मे - अल्पवयीन आरोपीची पाच जूनपर्यंत बाल सुधारगृहात रवानगी
२४ मे - मुलाचे वडील असलेल्या बांधकाम व्यावसायिकासह पब चालक व कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
२४ मे - तपासात दिरंगाई केल्याबद्दल येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी निलंबित
२५ मे - तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
२५ मे - बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल यांच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा
२५ मे - चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक
२६ मे - चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल अगरवाल यांना अटक
२७ मे - विशाल अग्रवाल, कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज
२७ मे - डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना अटक
२८ मे - चालकाला धमकावले म्हणून विशाल व सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी
३० मे - रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेतले असल्याची पोलिसांची न्यायालयात माहिती
१ जून - विशाल अगरवालसह पब मालकांच्या जामिनाबाबत पोलिसांचे म्हणणे सादर
१ जून - रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल व शिवानी विशाल अग्रवाल यांनी अटक
२ जून - शिवानी आणि विशाल अगरवाल यांना पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी
२ जून - डॉ. तावरेसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ
४ जून - रक्ताच्या नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी अश्पाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड यांना अटक
५ जून - मुलाऐवजी आईचेच रक्त घेतल्याचे डीएनए अहवालातून स्पष्ट झाले
५ जून - बांधकाम व्यावसायिक, कोझीचे मालक व ब्लॅक पबच्या कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
५ जून - अग्रवाल पती-पत्नीला दहा, तर डॉक्टरांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी
५ जून - मुलाचा बाल सुधार मुक्काम १२ जूनपर्यंत वाढविण्यात आला
१२ जून - अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी
१२ जून - मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढला
१५ जून - मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या मंडळाकडून पुष्कळ चुका राहिल्याचा चौकशी समितीचा अहवाल सादर
२५ जून - अल्पवयीन युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
१ ऑगस्ट - अगरवाल दाम्पत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, मकानदार, घटकांबळे विरोधात ९०० पानी दोषारोपपत्र दाखल
१५ नोव्हेंबर - सूद, मित्तल विरोधात २४२ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल
१० जानेवारी - सिंग विरोधात ४७७ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल
२३ एप्रिल २०२५ - शिवानी अगरवाल हिला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

Web Title: 1 year has passed since the Porsche accident 9 accused including the father are still in jail what exactly happened in the year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.