शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 21:53 IST

ग्रामीण भागासाठी ३५ हजार : पुण्याला ४५ हजार तर पिंपरीचिंचवडला २० डोस, कोव्हॅक्सीनचे ५० हजार तर कोव्हिशील्डचे लसीचे ५० हजार डोस

 जिल्ह्याला कोरोना लसीचे १ लाख डोस उपलब्ध

ग्रामीण भागासाठी ३५ हजार :  पुण्याला ४५ हजार तर पिंपरीचिंचवडला २० डोस, कोव्हॅक्सीनचे ५० हजार तर कोव्हिशील्डचे लसीचे ५० हजार डोस 

 

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे :  पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे काही  दिवसांपासून लसींचा साठा कमी भासत असून ज्यादा डोसेसची गरज भासत आहे. लस नसल्याने अनेक केंद्रावरून नागरिकांना लस न घेताच परत जावे लागल्याने अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. यामुळे आणखी लसींची मागणी जिल्ह्याकडून राज्याला करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीणसाठी एक लाख लसींचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाले. 

        कोरोना प्रतिबंध लसीचे प्राप्त झालेल्या एक लाख डोस पैकी ५० हजार डोस हे कोविशिल्डचे तर ५० हजार डोस हे कोव्हॅक्सीनचे मिळाले आहे. या लसींचे वितरण पुणे महानगरपालीका, पिंपरीचिंचवड महानगरपालीका आणि ग्रामीण विभागाला वितरीत करण्यात येणार आहे.  या लसींचे तात्काळ वितरण करण्याच्या सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. कोव्हिशिल्डच्या ५० हजार डोसपैकी पुणे महापालिकेला २० हजार, पिंपरी-चिंचवडला १० हजार  तर ग्रामीण भागासाठी  २० हजार डोस वितरीत केले जाणार आहे.  तर कोव्हॅक्सिनच्या ५० हजार डोसपैकी पुणे महापालिकेला २५ हजार, पिंपरी-चिंचवड महापालिकेला १० हजार आणि तर ग्रामीण भागाला १५ हजार लसींचे डोस दिले जाणार आहेत.  

  जिल्ह्यात लसीकरणाचा वेग जास्त असल्याने बारामती येथील केंद्रावरील लसींचा साठा संपला होता. यामुळे काही नागरिकांना लस न घेताच माघारी जावे लागले होते. हीच परिस्थिती काही तालुक्यांमध्ये होती. लस संपल्याबाबत काही जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. यामुळे लसींच्या आणखी डोसची मागणी राज्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी पुणे महानगरपालीकेला ५० हजार तर पूर्ण जिल्ह्यासाठी सोमवारी १ लाख लसींचे डोस मिळाले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जनजागृतीसोबतच ग्रामपंचायतींनी नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. 

कोट

संपूर्ण जिल्ह्यासाठी एक लाख डोस उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ३५ हजार डोस मिळणार आहेत. ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी ग्रामपंचायतींना लसीकरण केंद्रावर नागरिकांना घेऊन जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात याबाबत ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत.

आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे

 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस