"Why BJP and NCP did not form an alliance ?; Shocking revelation in the book ‘Trading Power’ | “भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; पुस्तकाच्या दाव्याने खळबळ

“भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; पुस्तकाच्या दाव्याने खळबळ

ठळक मुद्देमहाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे असं सांगत राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर करणार होतेनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेत्यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीदेवेंद्र फडणवीसांनी तातडीने अमित शहांसोबत चर्चा केली, दुसऱ्याच दिवशी दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्यावर बैठक झाली

मुंबई – महाविकास आघाडीच्या सरकारला १ वर्ष पूर्ण होत असताना लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, मागील वर्षी सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर प्रियम गांधींनी ‘Trading Power’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध केले आहे, या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यातील युती का फिस्कटली? याबाबत महत्वाचे दावे करण्यात आले आहेत.

लेखिका प्रियम गांधी म्हणाल्या की, मागच्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेत्यांनी वर्षावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं त्यांनी फडणवीसांना सांगितले, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने अमित शहांसोबत चर्चा केली, दुसऱ्याच दिवशी दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक झाली, या बैठकीत शरद पवार, अजित पवार, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा उपस्थित होते असं त्यांनी सांगितले.

या बैठकीत शरद पवारांनी स्वत: अमित शहांना भाजपासोबत येण्यास तयार असल्याचं सांगितलं, बैठकीत मुख्यमंत्री कोणाचा असेल आणि मंत्रिमंडळ फॉर्म्यूला कशा असेल यावर सविस्तर चर्चा झाली, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर लोकांची स्थितीचा आढावा पाहून महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे असं सांगत राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर करणार होते, २८ तारखेला शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना-काँग्रेसही सरकार बनवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शरद पवारांच्या मनात कधी काय असेल सांगता येत नाही, शिवसेना-काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अधिकार येतील यादृष्टीने शरद पवारांनी कदाचित विचार करून पुन्हा मन बदललं असावं, असा दावा लेखिकेने पुस्तकात केला आहे. टीव्ही ९ च्या विशेष मुलाखतीत प्रियम गांधींनी हा दावा केला,  

दरम्यान, शरद पवारांनी निर्णय बदलल्यानंतर अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी विरोध केला, अजित पवारांनी आक्रमकपणे भाजपाला पाठिंबा द्यावा असं म्हटलं, तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही त्यामुळे ठरल्याप्रमाणे भाजपाला पाठिंबा द्यावा असं अजित पवारांनी सांगितले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याने पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा अजित पवार ठरल्याप्रमाणे भाजपाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचं सांगितलं, फडणवीसांनी अजित पवारांना हे खरं आहे का? असं विचारलं, तेव्हा अजित पवारांनी माझ्यासोबत २८ आमदार असल्याचं सांगितले, त्यानंतर पुढील सर्व घटना घडली होती,

२२ नोव्हेंबरला नेहरू सेंटर येथे महाविकास आघाडीची बैठक सुरु असताना अजित पवार बैठकीतून थेट वर्षा बंगल्यावर पोहचले, देवेंद्र फडणवीसांना सांगितले की, या तिघांचे एकमत जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे आपल्याला आधी दावा करावा लागेल, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच अमित शहांशी चर्चा केली, त्यानुसार भाजपाने पाऊलं उचलली, अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते असल्याने त्यांच्याकडे आमदारांच्या सह्या होत्या, त्याआधारे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस केली, अजित पवारांसोबत असलेले आमदार भाजपाला पाठिंबा देण्यास तयार होते, परंतु सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने हा प्लॅन फिस्कटला असंही लेखिका प्रियम गांधी यांनी पुस्तकात म्हटलं आहे.    

Web Title: "Why BJP and NCP did not form an alliance ?; Shocking revelation in the book ‘Trading Power’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.