राजचा बाप कोण? सत्ताधारी पक्षातील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 06:47 PM2021-03-03T18:47:09+5:302021-03-03T18:53:06+5:30

Maharashtra Politics News : धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणांमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. त्यातच आता सत्ताधारी पक्षामधील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर आला.

Who is Raj's father? Another MLA from the ruling party is targeted by the BJP | राजचा बाप कोण? सत्ताधारी पक्षातील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर

राजचा बाप कोण? सत्ताधारी पक्षातील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर

googlenewsNext

मुंबई - धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणांमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाली आहे. (Mahavikas Aghadi Government) त्यातच आता सत्ताधारी पक्षामधील अजून एक आमदार भाजपाच्या निशाण्यावर आला आहे. राज नावाच्या मुलाचा बाप कोण, असा सवाल करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. (Who is Raj's father? Another MLA from the ruling party is targeted by the BJP)

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज नावाच्या एका मुलाने एका आमदाराकडे बोट दाखवत ते आपले वडील असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांची डीएनए चाचणी करावी, अशी याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यानंतर या मुलाच्या अपहरणाचाही प्रयत्न झाला, ही बाब राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला काळीमा फासणारी आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे. 

हा विषय दरेकर यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षातील एका आमदाराच्या डीएनए चाचणीचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. या व्यक्तीची पत्नी आणि मुलगा बाहेर आहेत. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच या मुलाला गायब केले गेले. नंतर तो सूरतमध्ये आमदाराच्या सागर नावाच्या मित्राकडे असल्याचे समोर आले. त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा दावा करत मानसोपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी सदर आमदारावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली.
 
दरम्यान, संजय राठोड प्रकरणामुळे विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. राठोड यांचा राजीनामा घेतला असला तरी त्यांच्या चौकशीसाठी विरोधक आक्रमक झाले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही पुढे आली आहे. 

Web Title: Who is Raj's father? Another MLA from the ruling party is targeted by the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.