शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

"रामभक्तांना भिकारी संबोधणे, हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व?", राम कदमांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 13:48 IST

Ram Kadam : अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली. 

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी भाग घेणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व आहे, असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली. 

"राम मंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि राम भक्ताची मनापासून इच्छा आहे की, निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असे असताना देखील, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधणे? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व?," असा सवाल राम कदम यांनी ट्विटरवरून विचारला आहे. तसेच, याचे उत्तर राम भक्तांना भिकारी संबोधनारे अब्दुल सत्तार यांनी इतरांना भिकारी म्हणण्यापूर्वी द्यावे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपाकडून निधी संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. यावरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात भाजपावर निशाणा साधला. भाजपाचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

याचबरोबर, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे, तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय, माझे नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, असा टोलाही त्यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

"चंद्रकांत दादांचे गणित कच्चे"गेल्या काही दिवसांपू्वी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. हा दावा अब्दुल सत्तार यांनी फेटाळून लावला आहे. "राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा शेवटून एक नंबर आहे. चंद्रकांत दादांचे गणित कच्चे असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे. भाजपा खोटी आकडेवारी देणारी पार्टी झाली असून ती जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच, महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर आहे," असे अब्दुल सत्तार म्हणाले. याशिवाय, आमच्याकडे परिपूर्ण आकडेवारी असून आकडेवारीच्या मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्यांना समोरासमोर येण्याचे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. 

टॅग्स :Ram Kadamराम कदमAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारणRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या