शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

संजय काकडेंना काँग्रेसमध्ये जरूर घ्या पण..: कार्यकर्त्यांच्या 'या' अटीमुळे श्रेष्ठी सापडले पेचात ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 17:27 IST

अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसकडे चाचपणी केल्यास कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी एक महत्वाची अट घातली आहे.

पुणे : पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले त्यानंतर भाजपनिवासी झालेले खासदार संजय काकडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या प्रयत्नाची चर्चा सध्या पुण्यातील राजकीय विश्वात रंगली आहे. मात्र काकडे यांना एका अटीवर घेण्याची गळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातल्याने काकडे यांच्यासह काँग्रेसचे वरच्या फळीतील नेतेही पेचात पडल्याचे सांगितले जात आहे.             आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अर्थात आघाडी विरुद्ध (झाल्यास )युती अशी होऊ शकते. त्यातचं राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला देण्यास हिरवा कंदील दाखवल्यामुळे काँग्रेसला प्रबळ उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.दुसरीकडे भाजपचे सध्याचे खासदार अनिल शिरोळे किंवा पालकमंत्री गिरीश बापट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काकडे यांना संधी मिळण्याची शक्यता आणि त्यातही कार्यकर्त्यांची मदत होणे तितकेसे सोपे नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस हा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे शिल्लक आहे.

            अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसकडे चाचपणी केल्यास कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी एक महत्वाची अट घातली आहे. त्यात काकडे यांना काँग्रेसमध्ये घ्यावे, नव्हे त्यांनी लोकसभाही लढवावी मात्र महापालिकेत त्यांच्या काकडे गटाचे असणारे नगरसेवक त्यांनी काँग्रेसमध्ये आणावेत आणि मगच तिकीट घ्यावे असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. अर्थात असे झाल्यास काकडे गटातील भाजप नगरसेवक आणि त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक मिळून सत्ता स्थापन करू शकतात. असे झाल्यास भाजपला हा मोठा सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. मात्र या सगळ्या घटनेसाठी काकडे यांनी नगरसेवक फोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये येणार का यापेक्षा 'ही' अट पूर्ण करून येणार का अशी चर्चा काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमात रंगली होती. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसSanjay Kakdeसंजय काकडे