शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

समन्स रद्द करण्यासंदर्भात एकनाथ खडसेंनी केलेली याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 00:25 IST

भोसरी भूखंड प्रकरण : ईडीची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दाखल केलेली याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही, असे ईडीने उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितले.

ईसीआयआर एफआयआरप्रमाणे नसतो. विभागाच्या कामकाजाचे ते एक कागदपत्र आहे. ईसीआयआर नोंदविला म्हणजे संबंधित व्यक्ती आरोपी होत नाही. चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना बोलाविले आहे. त्यामुळे ईसीआयआर रद्द करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे खडसे यांची याचिका दाखल करून घेण्यायोग्य नाही, असे ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.आधीच बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी किंवा भविष्यात तपास यंत्रणेने समन्स बजावू नये, यासाठी कोणी न्यायालयात येऊ शकत नाही, असे सिंग यांनी न्यायालयाला सांगितले.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देत सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीवर त्यांच्या पदाचा मान राखण्यासाठी अधिक नैतिकता बाळगावी लागते. त्यामुळे खडसे यांना दिलासा मिळू शकत नाही. ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी खडसे यांनी गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, खडसे न्यायालयाकडून दिलासा मागू शकतात. समन्स रद्द करण्याचीही विनंती ते करू शकतात. पुणे पोलिसांनी २०१७ मध्ये याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. त्यात त्यांनी खडसेंविरुद्ध पुरावे नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालय