"नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी?", पक्षप्रवेशानंतर चंद्रकांत पाटलांचा निशाणा  

By Ravalnath.patil | Published: October 23, 2020 07:02 PM2020-10-23T19:02:46+5:302020-10-23T19:03:24+5:30

Chandrakant Patil First Reaction On Eknath Khadse Joining NCP : तुमचे समाधान होईल,असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

nathabhau will get limlet pill or cadburys, chandrakant patil reaction on eknath khadse joining NCP | "नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी?", पक्षप्रवेशानंतर चंद्रकांत पाटलांचा निशाणा  

"नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी?", पक्षप्रवेशानंतर चंद्रकांत पाटलांचा निशाणा  

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबई : एकनाथ खडसेंच्या समाधानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी?  असा खोचक सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, भाजपामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. पण, त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.

भाजपाला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. यावेळी, "खडसे यांचा दुपारी दोन वाजता प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मग, तो दुपारी चारपर्यंत का लांबला, हे जयंत पाटील यांनी सांगावे. नाथाभाऊंना काय द्यायचं, हे ठरलं नाही. तुमचे समाधान होईल असे देऊ एवढ्यावर शेवटी नाथाभाऊ बळंबळं नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

याचबरोबर, "आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होते आणि कॅडबरीनेही समाधान होते. त्यामुळे आता त्यांना ते लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथा भाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असे म्हणतात, हे पाहावं लागेल", असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.

एकनाथ खडसे हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत आरोप करत आहे. यावर "एकट्या देवेंद्र फडणवीस यांना  नाथाभाऊंनी टार्गेट करणे बरोबर नाही. भाजपाचे निर्णय सामूहिक असतात. त्यामुळे त्यांनी फडणवीसांवर टीका करणे योग्य वाटत नाही," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. ४० वर्ष काढल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावासा वाटला नाही. विधानसभा निवडणुकीतही मानहानी आणि छळ करण्यात आला. मी याबाबत वरिष्ठांना सभागृहात पुरावे देण्याची विनंती केली, मात्र आजवर प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. 

याशिवाय, यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत एकनाथ खडसेंचे राष्ट्रवादी कार्यालयाच्या ठिकाणी स्वागत करण्यात आले. काही निवडक लोकांनाचा कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला होती, त्यामुळे कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती. तर तब्येतीच्या कारणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते.
 

Web Title: nathabhau will get limlet pill or cadburys, chandrakant patil reaction on eknath khadse joining NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.