शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

"अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात अनिल परबांचं नाव घेतंलय’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 1:43 PM

Narayan Rane News : १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबत नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पियोमध्ये ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांची हत्या, या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze Case )यांचे आलेले नाव. त्यानंतर १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबत नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  (Narayan Rane Says, "Anil Parab's name is mentioned in Anil Deshmukh's reply to CBI" )

नारायण राणे म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबानीमध्ये जी नावं घेतली आहेत त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनिल परब यांचं नाव घेतलं आहे. या प्रकरणात पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल, असं आम्ही उगाच म्हटलं नव्हतं. अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. अजिबात कमिशन न घेता जमा करायचं आणि आणून द्यायचं. हे त्यांचं काम आहे. त्यांची चौकशी सेवा आणि मेवा कसा गोळा केला आणि कुठे पोहोचवला, यासाठी ही चौकशी चालली आहे. 

दरम्यान, सीबीआय चौकशीचा अहवाल १५ दिवसांच्या आत जाहीर होईल. तसेच त्यामध्ये अनिल देशमुखांचं खरं रूप आणि ते कुणाच्या सांगण्यावरून हे करत होते त्यांचा भांडाफोड होईल. तसेच अनिल परब हे चौकशीसाठी तयार नसतील तर त्यांना उचलून चौकशीला नेलं जाईल, चौकशीला जाण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असेही नारायण राणे म्हणाले.   सचिन वाझे प्रकरणावरूनही माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सापडलेला सचिन वाझे हा एक आहे. मात्र नजरेसमोर आलेले सचिन वाझे अनेक आहेत. सरकारला नको असलेल्या लोकांना मारण्याचे काम सुरू आहे. आता एनआयएच्या तपासामधून अनेक बाबी उघड होतील, असा दावाही नारायण राणे यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Anil Parabअनिल परबAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार