शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास...; शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून बच्चू कडूंचा मोदी सरकारला थेट इशारा

By कुणाल गवाणकर | Updated: November 30, 2020 15:22 IST

गेल्या ४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू; दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर तणाव वाढला

नवी दिल्ली/मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाब, हरयाणातून हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर पोहोचले आहेत. सुरक्षा दलांनी त्यांना रोखून धरलं आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये अनेकदा चकमक घडली आहे. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला जात आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंनी मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे.केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करेन, असा इशारा कडूंनी दिला आहे. संजय राऊतांचाही मोदी सरकारवर निशाणाशिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक दिली जाणं हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर केला जात आहे. अशाच प्रकारे बळाचा वापर चीनविरुद्ध केला असता, तर लडाखमध्ये घुसखोरी झाली नसती, अशी टीका राऊत यांनी केली. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुचगेल्या चार दिवसांपासून हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन आंदोलनासंदर्भात चर्चा केली आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यांऐवजी मैदानात आंदोलन करावं. सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन शहांनी केलं आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरी