शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ, मतभेद उफाळून नेत्यांमध्ये झाली हमरीतुमरी

By बाळकृष्ण परब | Updated: January 12, 2021 17:25 IST

Corngress News : बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातलामाजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केलीबोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. बिहारकाँग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास हे जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले असताना त्यांना पक्षामधील अंतर्कलहाची जाणीव झाली. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातला.काँग्रेसचे माजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते आपली खुर्ची सोडून गोंधळ घालू लागले.त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भक्तचरण दास यांनी त्यांना मंचावर बसवले. मात्र त्यांना बोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला.दरम्यान, ही आरोपबाजी सुरू असताना भक्त चरण दास हे संजीव प्रसाद टोनी यांना अशाप्रकारचे आरोप न करण्याबाबत वारंवार बजावत होते. एकावेळी हा गोंधळ एवढा वाढला की पोलीससुद्धा हॉलमध्ये आले. मात्र भक्त चरण दास यांनी त्यांना परत पाठवले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत बैठक संपल्याची घोषणा अचानक करण्यात आली.काँग्रेसच्या या बैठकीत संजीव टोनी आणि शकीलुज्जमा, जनार्दन शर्मा यांच्यासारख्या नेत्यांनी निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याचा आरोप उघडपणे केला. माजी विधान परिषद आमदार लाल बाबू लाल यांनी व्यवस्थेच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा गोंधळ अधिकच वाढला. तसेच त्यानंतरच्या कार्यक्रमात नेते दोन गटांत विभागलेले दिसून आले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBiharबिहार