शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची मंगळवारी महत्वाची बैठक; पालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 07:43 IST

MNS News: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. लवकरच राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तर, वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृष्णकुंजवरील बैठकांचे सत्र आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेली विविध आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. आपापल्या भागातील राजकीय स्थिती मांडण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. लवकरच राज्यातील विविध महापालिका निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तर, वर्षभरावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात मनसेनेही संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष दिले आहे. गेल्या काही काळापासून कृष्णकुंजवर पक्षाच्या विविध आघाड्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील घडामोडींचा आढावा घेतला जात आहे. आता मंगळवारी मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, त्यासाठी पक्ष संघटनेची सद्य:स्थिती, तयारी, राजकीय-सामाजिक समीकरणे आदींबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शिवाय, आगामी काळात स्थानिक कार्यकर्त्यांना पदे आणि जबाबदाऱ्या देण्याबाबतही चाचपणी सुरू आहे.

कोरोनाकाळात आपल्या मागण्यांसाठी विविध शिष्टमंडळे ‘कृष्णकुंज’वर धाव घेत होती. डाॅक्टरांपासून पालक, विद्यार्थी, मुंबईतील डबेवाले, मत्स्यविक्रेते, जीममालक-चालक अशा विविध घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज यांनीही विजेसह अन्य प्रश्नांवर कधी राज्यपालांची भेट घे, तर कधी संबंधित खात्याच्या मंत्र्याशी बोलणे करत विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. या सर्वांचा उपयोग निवडणुकीत व्हायचा असेल तर संघटनात्मक बांधणी व नियोजनबद्ध कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मंगळवारची पदाधिकाऱ्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना