UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 01:19 PM2021-07-13T13:19:36+5:302021-07-13T13:24:39+5:30

UP Election 2022: भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे.

up election 2022 aap refused alliance with bhagidari sankalp morcha | UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

googlenewsNext
ठळक मुद्देओमप्रकाश राजभर चुकीची वक्तव्ये करतायेतआप नेते संजय सिंह यांची टीकाभागीदारी संकल्प मोर्चात बिघाडीची चिन्हे!

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांनी आघाडी करण्यास सुरुवात केली असून, काही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. यातच आता भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे. (up election 2022 aap refused alliance with bhagidari sankalp morcha)

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओम प्रकाश राजभर आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर आता आप नेते संजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

आघाडीचे वृत्त खोटं, आधारहीन

प्रकाश राजभर आणि आप नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही. आप पक्ष भागीदारी संकल्प मोर्चात सहभागी होणार असल्याचे वृत्त, चर्चा खोट्या आणि आधारहीन आहेत. राजभर चुकीची वक्तव्ये करत आहेत. केजरीवाल यांनी राजभर यांची भेट घेतलेली नसून, कोणत्याही मोर्चा, आघाडीत आप आताच्या घडीला तरी सहभागी होत नाही, असे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका

निवडणुकीवेळी भाजपला आठवण होते

यापूर्वी बोलताना, भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते, असा दावा राजभर यांनी केला आहे. 

“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

दरम्यान, एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: up election 2022 aap refused alliance with bhagidari sankalp morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.