स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: June 13, 2024 11:10 PM2024-06-13T23:10:31+5:302024-06-13T23:11:18+5:30

स्टार एअर आपल्या सेवेचा विस्तार करीत आहे. ही घोषणा स्टार एअरसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल. या उड्डाणांच्या समावेशासह, नांदेड आता भारतातील एकूण नऊ प्रमुख स्थळांशी जोडले गेले आहे.

Star Air's Nagpur-Nanded flight from 27 Monday, Tuesday, Thursday, Friday will be four days | स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार

स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार

नागपूर : स्टार एअर कंपनीने नागपूर आणि पुणेकरिता दोन नवीन विमाने नांदेडहून २७ जूनपासून सुरू करण्याची घोषणा केली. ही विमान सेवा आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे चार दिवस सुरू राहील.

स्टार एअर आपल्या सेवेचा विस्तार करीत आहे. ही घोषणा स्टार एअरसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल. या उड्डाणांच्या समावेशासह, नांदेड आता भारतातील एकूण नऊ प्रमुख स्थळांशी जोडले गेले आहे. हा विस्तार स्टार एअरच्या प्रवाशांना सोयीस्कर, विश्वासार्ह आणि परवडणारा हवाई प्रवास राहील. नवीन विमान नागपुरातून सकाळी ९.१५ वाजता निघून नांदेडला १०.०५ वाजता पोहोचेल. तर नांदेडहून दुपारी १.१० वाजता निघून नागपुरात २ वाजता येईल. याशिवाय नांदेड-पुणे विमान सकाळी १०.३० वाजता निघून पुणेला ११.३० वाजता पोहोचणार आहे. तर हेच विमान पुणेहून दुपारी ११.५५ वाजता निघून नांदेडला १२.४५ वाजता येईल. 

स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरन सिंग म्हणाले, यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. नांदेड आमच्यासाठी महत्त्वाचे शहर आहे. प्रवाशांना अधिक प्रवास पर्याय मिळेल.

Web Title: Star Air's Nagpur-Nanded flight from 27 Monday, Tuesday, Thursday, Friday will be four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.