शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

"अमित शहाजी, शरद पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, जरा देशाला सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 2:45 PM

congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar: शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ; तर्कवितर्कांना उधाण

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते भेटीच्या वृत्ताचं खंडन करत असताना दुसरीकडे खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाही' असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये शहा आणि पवार यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेनं याबद्दल काहीशी सावध भूमिका घेतली असताना काँग्रेसनं मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. (congress raised questions on the meeting between amit shah and ncp chief sharad pawar)यातचं सगळ आलं, पवार-शहा भेटीवर भाजपने अधिकृत भूमिका मांडलीगृहमंत्री जर देशातल्या एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील, तर त्यांना याबद्दल देशाला सांगायला हवं. त्या भेटीत नेमकं काय झालं, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असं काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी म्हटलं आहे. अमित शहा आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली असेल, तर त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, असं दीक्षित म्हणाले.‘ती’ भेट झालीच नाही, पवार-शहा भेटीची नुसतीच चर्चा, राष्ट्रवादीकडूनही खंडनअमित शहा आणि शरद पवार यांची अहमदाबादमध्ये भेट झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मात्र भेटीचं वृत्त फेटाळून लावलं. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गृहमंत्री अमित शहांना भेटल्याच्या वृत्ताची चर्चा आहे. गेल्या २ दिवसांपासून ट्विटरवर तशा अफवा उडवल्या जात आहेत. मात्र अशी कोणतीही भेट झालेली नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.पवार-शहा भेटीवर संजय राऊत म्हणतात...शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवार-शहा यांच्या भेटीच्या चर्चेवर एक ट्विट केलं आहे. "मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही" असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी संजय राऊत यांनी शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. पण, गुप्त काहीच राहत नसतं, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, सार्वजनिक होतात असं म्हटलं होतं,'' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शहाPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसnawab malikनवाब मलिकSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना