शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

Maharashtra Vidhan Sabha : राज्यपाल म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, काँग्रेस नेत्याचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 11:07 AM

Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari : काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे.

मुंबई : Budget Session 2021: राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. यावरून पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आमदार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी असल्याचा उपरोधिक टोला आमदार संजय जगताप यांनी लगावला. (Congress MLA Sanjay Jagtap  criticizes Governor Bhagat singh Koshyari)

बुधवारी विधानसभेत संजय जगताप बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर झालेल्या भाषणात आमदार संजय जगताप यांनी राज्यपालांवर टीका केली. एकीकडे राज्यपाल कोरोना काळातील कामगिरीबद्दल सरकारचे कौतुक करतात, दुसरीकडे राज्यपाल राज्य सरकारशी संघर्ष करतात. राज्यपालांची ही कृती म्हणजे जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार कन्हैयालाल चतुर्वेदीसारखी असल्याचे संजय जगताप यांनी म्हटले. याचबरोबर, संजय जगताप यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती यावेळी सभागृहात दिली.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित पडला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, मात्र, अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने अनेकवेळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

"आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवलेले आमदार मोकळे करावेत"मंगळवारी संजय राऊत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोला लगावला. ते म्हणाले, "महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटत असेल. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत." याचबरोबर, राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला.  

टॅग्स :congressकाँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण