शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

व्यसनी कंगना राणौतनं घेतली राज्यपालांची भेट; काँग्रेस नेत्याचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 9:55 PM

कंगना राणौतनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची घेतली भेट

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाकयुद्ध थांबलेलं असताना आता काँग्रेस नेत्याच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कंगनानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. यावेळी तिनं मुंबई महानगरपालिकेनं तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईची माहिती दिली. पालिकेची कारवाई अन्यायकारक असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी तिनं राज्यपालांकडे केली. कंगनानं घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीवर काँग्रेस नेते उदित राज यांनी निशाणा साधला. कंगनानं तिची बहिण रंगोली चंडेलसह जवळपास पाऊण तास राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी एखाद्या वडिलांसारख्या माझ्या समस्या ऐकून घेतल्या. आता मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा कंगनानं राज्यपालांच्या भेटीनंतर व्यक्त केली. या भेटीवर उदित राज यांनी अतिशय तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'व्यसनी कंगना रणौत आज राज्यपालांना भेटली. गोदी मीडिया, भाजप आयटी सेल आणि भक्त सगळेच समर्थन करत आहेत. चोर, अपराधी, भ्रष्ट अशा सगळ्यांचं स्वागत होऊ शकतो. फक्त तो भाजपचा समर्थक हवा,' असं ट्विट राज यांनी केलं आहे. 

शिवसेनेचा सूर बदललाअभिनेत्री कंगना राणौतकडून दररोज शिवसेनेवर जोरदार हल्ले सुरू आहे. मात्र शिवसेनेनं आता आपला पवित्रा बदलला आहे. कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. देशात त्याहीपेक्षा महत्त्वाचे विषय आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात आम्ही ते उपस्थित करू, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं राऊत म्हणाले.कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; राऊतांनी शिवसेनेचा पुढील 'प्लान' सांगितला

भाजपच्या हालचाली, विधानांकडे लक्षमुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपच्या प्रत्येक हालचालीवर आपलं लक्ष असल्याचं सांगितलं. एखाद्यानं ठरवलंच असेल की तमाशाच करायचा, तर करू द्या, असा टोलादेखील त्यांनी लगावला.VIDEO: 'मी ड्रग्जच्या आहारी गेले होते'; कंगना राणौतचा जुना व्हिडीओ व्हायरल

नाव न घेता कंगनावर निशाणामुंबईत येतेय, रोखून दाखवा असं आव्हान देऊन मुंबईत दाखल झालेल्या कंगनावर शिवसेनासंजय राऊत यांनी नाव न घेता निशाणा साधला. ज्या पोलिसांना नाव ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असं म्हणत राऊत यांनी कंगनावर अधिक बोलणं टाळलं. ज्यांना माफिया म्हणता, त्यांच्याच संरक्षणात फिरता?; राऊतांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी