शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 11:43 IST

congress leader sanjay nirupam slams congress and ncp mlas: बाबरी मशीदबद्दलच्या विधानावरून काँग्रेस नेत्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना सुनावले खडे बोल

मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल विधानसभेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर, औरंगाबादचं नामांतर, राम मंदिर यांच्यासारख्या अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केलं. बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला गेल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना खडे बोल सुनावले आहेत.उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं- सुधीर मुनगंटीवार'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी मशिदीच्या विध्वंसाबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काँग्रेस आणि एनसीपीचे मंत्री आणि आमदार त्यांच्या भाषणाचा आनंद घेत होते. हा हा कोणता किमान समान कार्यक्रम? ओवैसींच्या विषारी रोपट्याच्या वाढीला यातूनच खतपाणी मिळत नाही की का?,' असे प्रश्न निरुपम यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत. 

विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री?'विरोधक बाळासाहेबांची वेळोवेळी आठवण काढतात. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. निदान त्यांना तरी विसरला नाहीत. त्यांना विसरणार नसाल, तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी पाडली तेव्हा येरेगबाळे पळून गेले होते. पण बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. आता विषय असा आहे की बाबरी कोणी पाडली ते आम्हाला माहीत नाही. पण शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. केवळ अभिमान नाही, तर गर्व आहे. सहा वर्षात केंद्रात सत्ता असताना राम मंदिरासाठी कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता घरोघरी जाऊन मंदिरासाठी पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे जनता देणार. पण नाव यांचं येणार,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Nirupamसंजय निरुपमBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसbabri masjidबाबरी मस्जिदRam Mandirराम मंदिरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे