शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Coronavirus : "राहुल गांधींनी परदेशी लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता, त्यावेळी टीका केली; पण आता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 3:48 PM

Coronavirus Vaccinations : काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारवर निशाणा. ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेनं मान्यता दिली आहे  त्या सर्व लसींना भारतानंही मंजुरी दिली आहे. 

ठळक मुद्देजगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेनं मान्यता दिली आहे  त्या सर्व लसींना भारतानंही दिली मंजुरीयापूर्वी केंद्रानं रशियाच्या स्पुतनिक V लसीच्या आपात्कालिन वापरास दिली मंजुरी

देशातील लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने (Narendra Modi) मंगळवारी मोठा निर्णय घेतला. ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेनं मान्यता दिली आहे  त्या सर्व लसींना भारतानंही मंजुरी दिली आहे. सरकारनं आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे त्या संस्था अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि WHO शी संबंधित आहेत. दरम्यान यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सरकारला टोला लगवाला आहे. "सरकारनं विरोधी पक्षांच्या सूचना टीका आहेत असं समजून नाकारू नये ही समृद्ध लोकशाहीची परंपरा आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी परदेशी फार्मा कंपन्यांच्या लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता. काही मंत्र्यांनी त्यानंतर त्यांच्यावर टीका केली. पण चार दिवसांनी सरकारनं राहुल गांधींचाच सल्ला मानला," असं म्हणत संजय निरुपम यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली. काय आहे विषय?लसीला मंजुरी देणाऱ्यांत यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूकेएमएचआरए, पीएमडीए जपान आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचा समावेश आहे. यापूर्वी सरकारने रशियाच्या स्पुटनिक-V लसीच्या आपात्कालिन वापराला मंजुरी दिली आहे. सरकारने ज्या लसींना परवानगी दिली आहे, त्या लसींची सर्वप्रथम पुढील ७ दिवसांपर्यंत १०० रुग्णांवर चाचणी केली जाईल. यानंतर देशाच्या लसीकरण कार्यक्रमात त्यांचा समावेश करण्यात येईल. या निर्णयामुळे भारतात लसींची आयात करायला आणि लसीकरण कार्यक्रमात गती आणण्यास मदत मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. तसेच, या निर्णयामुळे औषध निर्माता कंपन्यांना परदेशी लस भारत तयार करण्याची मंजुरी मिळविणेही सोपे होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSanjay Nirupamसंजय निरुपमcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस