शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत, हे आहे "कारण"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 11:34 AM

PM Narendra Modi in Pune to visit Serum Institute: प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या राजकीय दौरे सोडून अन्य दौऱ्यांच्या स्वागताला मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी उपस्थित राहणे गरजेचे असते. मात्र, यावेळी मुख्यमंत्रीच नाहीत तर राज्यपालही मोदींच्या स्वागताला पुण्याला जाणार नाहीत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोरोना लसींच्या उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते गुजरातला झायडस पार्कला गेले असून तिथे कोरोना लसीचा आढावा घेत आहेत. यानंतर ते हैदराबादला जाणार आहेत. तेथून पुण्याला येणार असून सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र, प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपुणे विमानतळावर पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहणार नाहीत. 

प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांच्या राजकीय दौरे सोडून अन्य दौऱ्यांच्या स्वागताला मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यपालांनी उपस्थित राहणे गरजेचे असते. मात्र, यावेळी मुख्यमंत्रीच नाहीत तर राज्यपालही मोदींच्या स्वागताला पुण्याला जाणार नाहीत. यामागे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या सूचना आहेत. 

पंतप्रधान हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे. या सुचनेमुळेच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. 

महत्वाचे म्हणजे गुजरातमध्येही मुख्यमंत्री विजय रुपाणी पंतप्रधान मोदींच्या स्वागताला आले नव्हते. पंतप्रधानांचे स्वागत पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच झायडसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले होते. 

शंभर देशांच्या राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला 4 डिसेंबर रोजी भेट देणार होते. परंतु राजदूतांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. दौरा निश्चित झाल्यावर पुन्हा कळविण्यात येईल असे लेखी पत्र आले असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.  

 

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधित होणाऱ्या कोरोनावरील लसीच्या उत्पादनाचे हक्क पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने मिळवले आहेत. ऑक्सफोर्डच्या लसीच्या प्राथमिक चाचण्या समाधानकारक आल्या आहेत.त्यामुळे लस उत्पादनाची जगातली सर्वात मोठी क्षमता असल्याने 'सीरम'कडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत येत्या 4 डिसेंबर रोजी पुणे दौ-यावर येणार होते. राजदूत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शनिवार (दि.28) रोजी तातडीने पुणे दौऱ्यावर येत असून, सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीचे उत्पादन व वितरण याचा आढावा घेणार आहेत. परंतु आता राजदूतांचा पुणे दौरा तात्पुरता रद्द झाला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीcorona virusकोरोना वायरस बातम्या