शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष बांगलादेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 1:31 AM

मंत्री अस्लम शेख आणि भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांच्या सत्रामध्ये राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख आणि भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.  

काही दिवसांपूर्वी मालवणीत राम मंदिर बांधणीसाठी देणगी देण्याचे आवाहन करणारे बॅनर्स पोलिसांनी फाडल्याचा व याबद्दल जाब विचारायला गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदविल्याचा आरोप करणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांना प्रत्युत्तर देताना अस्लम शेख म्हणाले, ज्या मुंबई पोलिसांची तुलना लंडनच्या ‘स्काॅटलंड यार्ड’शी केली जाते, त्यांच्यावर केवळ  स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे योग्य नाही. शेख यांनी लोढांच्या मालवणीमधील  हिंदू पलायनाच्या मुद्द्याचा खरपूस समाचार घेताना ज्या मतदारसंघामध्ये ३ लाख मतदारांपैकी २ लाख ३० हजारपेक्षा जास्त मतदार हिंदू आहेत, तिथे हिंदू अल्पसंख्याक कसे काय असू शकतात, असा सवालही अस्लम शेख यांनी विचारला.

लोढा यांनी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा काढताच अस्लम शेख यांनी  भाजप उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप केला. यावर हे सत्य असेल तर मी राजीनामा देईन, असं म्हणत हे जर खोटं असेल तर अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान लोढांनी शेख यांना दिलं.काही दिवसांपूर्वी रुबेल शेख नावाच्या बांगलादेशी घुसखोरास पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी अटक केली होती. चौकशीअंती हा युवक भाजप उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष असल्याचं स्पष्ट झालं होतं. शेख यांना विधानसभेत आव्हान देणारे लोढा आता आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं  ठरणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा