शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:10 IST

महापालिकेत ‘आप’ने ४, तर काँग्रेसने जिंकली एक जागा

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पेट्रोल, गॅस दरवाढ याचा रोष दिल्लीकरांनी भाजपवर काढल्याचे दिल्ली महापालिकेच्या पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांतून स्पष्ट झाले आहे. भाजपला पाचपैकी एकही जागा जिंकता आली नाही, तर आम आदमी पक्षाने चार व काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला.   या पाचपैकी चार जागा आधी आम आदमी पक्षाकडे होत्या. तेथील आपचे नगरसेवक विधानसभेवर निवडून गेले, तर भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झाले. त्यामुळे या पोटनिवडणुका झाल्या. या पाचही जागा जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद लावली होती. पाचही जागा आम्हालाच मिळतील, असा दावा भाजपने केला होता. 

   पण आपने रोहिणी सी, शालिमार बाग, त्रिलोकपुरी, कल्याणपुरी या प्रभागात बाजी मारली आहे. कॉंग्रेसने चौहान बांगडची जागा जिंकली. तेथून काँग्रेस उमेदवाराने १० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. आजच्या निकालांमुळे आम आदमी पार्टी व काँग्रेस यांच्यात प्रचंड उत्साह दिसला.  दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आहे; परंतु यावेळी मतदारांनी आम आदमी पार्टीला पसंती दर्शवली. दिल्लीच्या सीमांवर तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याचा त्रास दिल्लीकरांना होत आहे. केंद्र सरकार अद्याप कोणताही तोडगा काढत नसल्याने मतदारांत नाराजी होती. दिल्ली मनपाच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार आहेत. त्यावेळी तिन्ही पालिकांत आम्हालाच बहुमत मिळेल, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस