दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण द्या; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 13:56 IST2021-02-13T13:53:07+5:302021-02-13T13:56:01+5:30
Ashish Shelar demands : कोरोनामुळे परीक्षा झाल्या नाहीत हा विद्यार्थ्यांना दोष नाही, शेलार यांचं वक्तव्य

दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण द्या; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची मागणी
"दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे अंतर्गत गुण सरसकट द्या," अशी मागणी भाजप नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. कोरोनामुळे कला व क्रीडांच्या स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान सरकारने करू नये. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई शाखेच्यावतीने परेल येथे घेन्यात आलेल्या अधिवेशनात आशिष शेलार यांनी अंतर्गत गुण सरसकट द्या अशी मागणी केली.
"राज्य सरकारने ज्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा पूर्ण बट्ट्याबोळ करण्याचं काम केल आहे. त्या विरोधात एल्गार करण्याची आवश्यकता आहे. त्याला पूर्ण समर्थ भारतीय जनता पक्षाचा असेल," असं आशिष शेलार यावेळी म्हणाले. शैक्षणिक वर्षामध्ये कला आणि क्रीडा या विषयाच्या अंतर्गत गुण विद्यार्थ्यांना मिळणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
"या कला आणि क्रीडा विषयाचे अंतर्गत गुण सरसकट विद्यार्थ्यांना मिळालेच पाहिजेत. कोरोनामुळे जर एलिमेंट्री पासून क्रीडा विषयीच्या परीक्षा झाल्या नसतील नसतील तर विद्यार्थ्यांचा दोष नाही. त्यामुळे प्रस्तावाची नुसती वेळ वाढवून देऊन चालणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण मिळाले पाहिजेत," असं शेलार यांनी नमूद केलं.