ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 02:46 PM2021-03-02T14:46:55+5:302021-03-02T14:52:57+5:30

chitra wagh hits back at ncp mla amol mitkari: मिटकरींच्या टीकेला चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

bjp leader chitra wagh hits back at ncp mla amol mitkari | ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर

ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर

googlenewsNext

मुंबई: सिंहाच्या तालमीत तयार झालेले वाघ आता केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मिटकरींना भाजप नेत्या चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, अशा शब्दांत वाघ यांनी मिटकरींना सुनावलं. (bjp leader chitra wagh hits back at ncp mla amol mitkari)

ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्ट

'अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? पक्षानं तुला आमदारकी दिली आहे. नेटानं काम कर,' असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला. 'चांगला आवाज आहे. बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, ते बापालाच जाऊन विचार. साहेबांना विचार, ते तुला सांगतील,' असं प्रत्युत्तर वाघ यांनी मिटकरींना दिलं.

फडणवीसांचे प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ घोषणा; वीज ग्राहकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, या प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. वाघ यांनी अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला. त्यावर मिटकरींनी ट्विट करत टोला लगावला. 'वाघाची डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते,' असं मिटकरींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Web Title: bjp leader chitra wagh hits back at ncp mla amol mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.