ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 01:46 PM2021-03-02T13:46:43+5:302021-03-02T13:48:40+5:30

2nd Day Of Budget Session 2021: कोरोना रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी वाचून दाखवत ठाकरे सरकारवर शरसंधान

bjp leader devendra fadnavis slams thackeray government over various issues | ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्ट

ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्ट

Next

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींना सरकारनं दिलेलं भाषण एखादं चौकातलं भाषण वाटतं. त्यात यशोगाथाच नव्हे, केवळ आणि केवळ व्यथाच दिसतात, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

फडणवीसांचे प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ घोषणा; वीज ग्राहकांसाठी सरकारचा मोठा निर्णय

ठाकरे सरकारला कोरोना हाताळण्यात अपयश आल्याचा दावा फडणवीस यांनी आकडेवारीसह केला. 'देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ९ टक्के लोकसंख्या आपल्या राज्यात आहे. पण देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के कोरोना रुग्ण राज्यात आहेत. सक्रिय रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या राज्यात ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी विधानसभेत सांगितली.

"आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबून ठेवले आमदार मोकळे करावेत", संजय राऊतांचा निशाणा

तीन पक्षांचं सरकार अनेक गोष्टींमध्ये दिरंगाई करत असल्याची टीका त्यांनी केली. 'एखादा विभाग स्टूल खरेदीसाठी मंत्रालयाशी पत्रव्यवहार करतो. मग मंत्रालयाकडून त्या विभागाला तुम्ही स्टूलची उंची किती हवी तेच नमूद केली नसल्याचं पत्रातून कळवलं जातं. उंची नमूद केल्यावर स्टूल लाकडी हवा की लोखंडी की फायबरचा याबद्दल मंत्रालयातून विचारणा होते. त्याला पत्रानं उत्तर दिल्यावर स्टूलाला किती पाय हवेत असा प्रश्न विचारला जातो. मग पुन्हा स्टूलाचं वजन किती हवं याची विचारणा होते. शेवटी तो स्टूल काही संबंधित विभागाला मिळत नाही. मग एखादी घटना घडल्यावर मंत्रालयातून स्टूलाबद्दल विचारलं जातं. तेव्हा संबंधित विभाग पत्रव्यवहाराचे इतके कागद झाले की आम्ही आता त्यांचाच स्टूल म्हणून वापर करत असल्याचं सांगतो,' असा किस्सा सांगत फडणवीसांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला.

ठाकरे सरकार केवळ फेसबुक लाईव्ह करण्यात मग्न असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. सर्वसामान्य जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही. मुख्यमंत्र्यांनी आधी माझी कुटुंब माझी जबाबदारी अभियान आणलं. आता मी जबाबदार मोहीम सुरू आहे. म्हणजे सरकार स्वत: कशासाठीच जबाबदार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर खापर जनतेवर फोडायचं. इतर गोष्टींसाठी मोदी सरकारला जबाबदार धरायचं. मग राज्य सरकार नेमकं काय करतंय, असा सवाल त्यांनी विचारला.

Web Title: bjp leader devendra fadnavis slams thackeray government over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.