शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

“MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 2:25 PM

MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे.

ठळक मुद्देआपल्या घरगुती वादात, दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नकारोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावेभाजप आमदार गोपीचंद पडळकर याचे टीकास्त्र

मुंबई: गेल्या महिन्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील एका मुलाने आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली होती. यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यावरून पुन्हा एकदा भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, असा खोचक टोला लगावला आहे. (bjp gopichand padalkar criticises ncp rohit pawar and thackeray govt over mpsc)

गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. MPSC च्या नियुक्त्या रखडल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीय आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका

आपल्या घरगुती वादात, दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका. ‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं.. आणि MPSC सदस्यांच्या नियुक्त्यालाच ३० दिवस लावायचे तर MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या कधी? कृपया याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, या शब्दांत हल्लाबोल करत, नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

राजभवनामुळे लबाडी उघड

रोहित पवारांनी सांगितले होते, पण आता तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत. एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना ३१ जुलैआधी याद्या पाठवल्याचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले. मात्र राजभवनमधून २ ऑगस्ट रोजी याद्या आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात, हे सिद्ध झाले आहे, असे पडळकर म्हणाले. 

काय सांगता! वय वर्षे १२ अन् जेवणात खातो तब्बल ४० चपात्या; डॉक्टरही चक्रावले

दरम्यान, ३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा अजित पवारांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. त्यामुळे या सरकारला MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते. या प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेले नाही, असा घणाघात पडळकर यांनी यापूर्वी केला होता.  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे