शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 12:39 PM

Lok Sabha Election 2024 : नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊतांना राज ठाकरे यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विनायक राऊत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल कणकवली येथे जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसह विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. 

नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊतांना राज ठाकरे यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाकावर बसणाऱ्या खासदारांनी अनेक विकास केले आहेत. परंतु, मौनी खासदाराचं कौतुक करण ही सध्या राज ठाकरे यांची मजबुरी असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. आमच्या शेती, फळबागा, जमीन याचं नुकसान करायचं. सध्या मोदी- शहांचे नवीन भक्त झालेले खरोखरचं महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? याचे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. याचबरोबर, राज ठाकरे यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी त्यांना नकली मोदी भक्तदेखील म्हटलं आहे. ते म्हणाले, काही मोदींचे अंध भक्त मधेच जागे होतात. पण ते ही नकली अंध भक्त असतात. काही दिवसांतच त्यांचे विचार बदलतील. नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात काय दिवे लावले? याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱ्या नेत्यांनी करावा. १० पक्षांतर करुन मंत्रीपद घेणे हा विकास आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. 

विनायक राऊत यांना बाकावर बसणारा खासदार म्हणणं चुकीचं आहे. बाकावर बसून, बाक बडवून अनेक खासदारांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडले आहेत. विकास कोकणात आणला आहे. असं बोलून राज ठाकरेंनी कोकणातील खासदारांचा अपमान केला आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, मौनी खासदाराचं कौतुक करण ही सध्या राज ठाकरेंची मजबुरी असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

मोदी शहांनी महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले. भ्रष्टाचारावर हल्ले केले. त्यावर नारायण राणेंनी तोंड उघडलं का? हे नकली अंधभक्त आहेत, उद्या त्यांची भक्ती बदलू शकते. तसेच, महाराष्ट्र, मुंबईतील प्रकल्प गेले. महाराष्ट्राची सध्या लुट चालू आहे, त्यावर नारायण राणे- राज ठाकरे जोडीने तोंड उघडलं का? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग