शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 12:26 PM

सर्वांना आपले व्यसन लावणाऱ्या मोबाईलचे दुष्परिणाम देखील अनेक आहेत.

आजच्या धावपळीच्या जगात मोबाईल एक गरज बनली आहे. पण, लहानग्यांपासून ज्येष्ठांना आपले व्यसन लावणाऱ्या मोबाईलचे दुष्परिणाम देखील अनेक आहेत. याचाच प्रत्यय देणारी घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे. येथील खैरागड-चुईखदान-गंडई जिल्ह्यातील घटनेने एकच खळबळ माजली. १४ वर्षीय बहिणीने १८ वर्षीय भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित तरूणीला तिच्या भावाने मोबाईल वापरण्यास मनाई केली असता, त्यानंतर तिने भावावर कुऱ्हाडीने वार केले ज्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटना घडली तेव्हा १४ वर्षीय मुलगी आणि तिचा १८ वर्षीय भाऊ दोघेच घरात होते. यावेळी घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी ती तिच्या भावासोबत घरी एकटी होती. मुलीच्या मृत भावाचे नाव देवप्रसाद वर्मा असे आहे. 

भाऊ बहीण घरी एकटे असताना देवप्रसादने तिच्या बहिणीला फोन न वापरण्यास सांगितले. देवप्रसादने आपल्या बहिणीला इतर मुलांशी न बोलण्याचा वारंवार सल्ला दिला. तरी देखील बहिणीने न ऐकल्याने तो काही वेळाने घरात जाऊन झोपला. भावाचे बोलणे ऐकून संतापलेल्या बहिणीने तो झोपलेल्या अवस्थेत असताना कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

१४ वर्षीय तरूणीने केली हत्यादरम्यान, देवप्रसाद झोपला असता त्याच्या बहिणीने कुऱ्हाडीने वार केले, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर ती आंघोळीसाठी गेली आणि तिच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग काढले. यानंतर ती घरातून बाहेर आली आणि तिने आपल्या भावाचा कोणीतरी खून केल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. हे ऐकून स्थानिकांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. मग पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी त्यांनी संशयावरून मुलीची चौकशी केली असता तिने सत्य सांगितले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलDeathमृत्यू