Join us  

करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 11:57 AM

2000 मध्ये 'मिस युनिव्हर्स' विजेती ठरलेली लारा दत्ता आता 46 वर्षांची आहे.

'मिस युनिव्हर्स 2000' ची विजेती ठरलेली लारा दत्ता (Lara Dutta)  बॉलिवूडमध्ये एकेकाळी आघाडीवर होती. तिच्या सौंदर्यावर  लाखो फिदा होते. टेनिसपटू महेश भूपतीने तर तिला थेट लग्नाचीच मागणी घातली. 2011 साली दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लारा फारशी सिनेमांमध्ये दिसली नाही. आता ती आगामी 'रणनीति:बालाकोट अँड बियाँड' या सीरिजमध्ये दिसणार आहे. तसंच 'वेलकम टू जंगल' या आगामी कॉमेडी सिनेमातही तिची भूमिका आहे. वाढत्या वयासोबत वेगळ्या भूमिकाही मिळतात असं ती म्हणाली.

लारा दत्ता या महिन्यात 46 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वयातही तिचं सौंदर्य अगदी तसंच आहे. वय वाढत जातं तसं सिनेमांमध्ये भूमिका मिळणंही कमी होतं असा अनेकांचा समज असतो. पण लाराने विरुद्ध विधान केलं आहे. ती म्हणते, "विशिष्ट वय झालं की तुम्ही संकल्प करणं बंद करता. वाढतं वय तुम्हाला मर्यादापासून मुक्त करतं. आता ना कोणाच्या दृष्टिकोनावर जायचं ना मला नेहमीच ग्लॅमरस राहण्याबाबत विचार करायचा आहे. वयासोबत चांगल्या आणि वेगळ्या भूमिका मिळत आहे ज्या पहिले मिळत नव्हत्या. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता मला मजा येतीये."

ती पुढे म्हणाली, " फक्त महिलाप्रधान किंवा सोलो लीड सिनेमे करेन असा विचार मी कधीच केला नाही. आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी वेगवेगळे चित्रपट केले. मी मॉडेलिंग करुन आले होते, मिस युनिव्हर्स असल्याने कदाचित फिल्ममेकर्सला असं वाटायचं की मी ग्लॅमरस आहे. खरं म्हणजे तेव्हा अभिनेत्रींना नायकाची हिरोईन किंवा बहीण अशा भूमिका करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. फार कमी सिनेमांमध्ये मुलींना काहीतरी प्रयोगशील करण्याची संधी मिळायची."

टॅग्स :लारा दत्ताबॉलिवूडवेबसीरिजसिनेमा