शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

"किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा"; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:51 AM

BJP Atul Bhatkhalkar And Sharad Pawar : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई – सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) केंद्रस्थानी आले आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होतील असे संकेत दिले गेले. मात्र याच भेटीनंतर आणखी एका चर्चेला मोठं उधाण आलं आहे. आगामी 'राष्ट्रपती'पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचा चेहरा पुढे करावा यासाठी प्रशांत किशोर लॉबिंग करत असल्याची दिल्लीत चर्चा आहे. याच दरम्यान भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. "किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा" असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. 

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल असं देखील म्हटलं आहे. "शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते. त्याच्यामुळे अत्यंत हास्यास्पद हालचाली सुरू आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक विचारात घेतली तरी लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय त्यातून काही साध्य होणार नाही" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांचा चेहराच योग्य आहे असे विधान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. या विधानावरून अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची भातखळकर यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे. कधी ते उद्धव ठाकरेंच्या कोपराला गुळ लावतात, तर कधी शरद पवारांच्या, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडी टक्कर द्यायची असेल तर शरद पवारांना पुढे करावं लागेल असं म्हटलं जात आहे. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, भाजपाविरोधी आघाडी बनवायची असेल तर सध्या विरोधी पक्षाकडे चेहरा नाही. पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवारच योग्य चेहरा आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. विरोधकांची आघाडी बनवून मोदींना पर्याय उभा करायचा असेल तर शरद पवार चेहरा आहेत. तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात. शरद पवारांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. देशपातळीवर असा प्रयोग करायचा असेल तर शरद पवार सर्वमान्य चेहरा आहे. तेच योग्य ठरतील असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण