शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

१४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये पडणार मोठी फूट, भाजपाच्या बड्या नेत्याचे भाकीत

By बाळकृष्ण परब | Published: January 11, 2021 8:43 PM

Bihar Politics News : आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे.

ठळक मुद्देबिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाहीत्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेतयेत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला

पाटणा - अटीतटीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काठावर जय-पराजयाचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात राजकीय अस्थिरता आणि फोडाफोडीचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, आरजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जेडीयूमध्ये फूट पडण्याचा दावा केला असतानाच आता भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर देताना राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा दावा केला आहे. आरजेडीमध्ये मोठी फूट पडणार असून, येत्या १४ जानेवारीरपर्यंत हा पक्ष फुटणार असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केला आहे.बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन्हीकडून एकमेकांच्या गोटातील आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामंजस्याचा अभाव दिसत आहे. तर दुसरीकडे एनडीएमधील सदस्य एका सुरात महाआघाडीवर हल्लाबोल करत आहेत.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. आरजेडीचे आमदार सातत्याने दुसऱ्या पक्षांत दाखल होत आहेत. आरजेडीच्या नेतृत्वामध्ये जर ताकद असेल तर त्यांनी या आमदारांना रोखून दाखवावे. दरम्यान, १४ जानेवारीनंतर आरजेडीमध्ये फूट पडणार आहे आणि अनेक आमदार हे एनडीएमध्ये दाखल होतील.दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री आणि बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या विधानाला जेडीयूचे ज्येष्ठ नेते ललन सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. भूपेंद्र यादव यांना ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आरजेडीचे विलीनीकरण कुठल्याही पक्षात होईल, असे ललन सिंह यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वीही ललन सिंह यांनी असे विधान केले होते. जेडीयूने दारे उघडली तर आरजेडीचं अस्तित्व संपुष्टात येईल, असा दावा ललन सिंह यांनी त्यावेळी केला होता.आता आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी भूपेंद्र यादव यांच्या विधानावर टीका केली आहे. आरजेडीच्या आमदारांना फोडण्याएवढी पात्रता भाजपामध्ये नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमदारांना फोडून दाखवावं, असे आव्हानही दिले आहे. एनडीएमध्ये सुरू असलेल्या वादावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून असा दावा करण्यात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. त्यानंतर भाजपानेही शिवानंद तिवारी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज नाही तर उद्या आरजेडीमध्ये फूट पडणार आणि हा पक्ष संपुष्टात येणार हे निश्चित आहे, असे भाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल