शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मनसेला धक्का, आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा, एकाधिकारशाहीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 17:34 IST

Thane :  याआधी डॉ. ओंकार माळी  आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे.

 ठाणे : पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ठाण्यातील आणखी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

ओवळा माजिवडा उपविभाग अध्यक्ष प्रलय साटेलकर असे या पदाधिकाऱ्यांचे नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत ठाण्यातूनच पोहोचून दिले जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याआधी डॉ. ओंकार माळी  आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे. 

ठाणेमनसे म्हणजे अविनाश जाधव असे समीकरण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. त्यांना कोणती जबाबदारी दिली जात नाही. राज ठाकरेंवर नाराज नाही. गेले अनेक दिवस पक्षात  घुसमट होत होती शेवटी कंटाळून शनिवारी राजीनामा दिल्याचे साटेलकर यांनी सांगितले.

मनसेकडून आरोपांबद्दल स्पष्टीकरण
प्रलय साटलेकर हे बरेच वर्षे पक्षात कार्यरत नव्हते असे तेथील मनसैनिकांचे म्हणणे आहे. तरीही त्यांच्याशी संपर्क करून त्यांची म्हणणे जाणून घेऊ आणि नाराजी दूर करू. तसेच, राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणाचीही अडवणूक केली जात नाही, त्यांना थेट भेटता येते. दिवाळी आम्ही सर्व मनसैनिकांना घेऊन भेटायला गेलो होतो. तसेच, अविनाश जाधव हे ठाणे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरू आहे.- रवींद्र मोरे, ठाणे शहर अध्यक्ष

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMNSमनसे