Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:30 IST

Nitin Morajkar Death News: ‘पालखी निघाली राजाची  या हो गणेशनगरात …’ या मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक असलेल्या आणि कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजावरील प्रसिद्ध गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं नुकतंच आकस्मिक निधन झालं आहे.

‘पालखी निघाली राजाची  या हो गणेशनगरात …’ या मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सवांपैकी एक असलेल्या आणि कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजावरील प्रसिद्ध गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं नुकतंच आकस्मिक निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे गणेशभक्तांकडून हळहळ व्यक्त होत आहे. 

लालबागच्या राज्याच्या मिरवणुकीवर आधारित असलेलं ‘पालखी निघाली राजाची  या हो गणेशनगरात …’ हे गीत केवळ लालबाग आणि मुंबईतीलच नव्हे तर राज्यभरातील गणेशभक्तांमध्ये अल्पावधीच लोकप्रिय झालं होतं. तसेच गणपतीच्या आगमन आणि विसर्जन सोहळ्यामध्ये हे आवर्जुन वाजवले जाते. 


दरम्यान,  नितीन मोरजकर यांच्या अकाली निधनाबद्दल लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी संगीत दिलेलं गीत गणेशभक्तांच्या कायम स्मरणात अजरामर राहील, अशी भावना व्यक्त केली आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Lalbaug Raja Song Composer Nitin Morajkar Passes Away

Web Summary : Nitin Morajkar, composer of the popular Lalbaug Raja song 'Palkhi Nighali Rajachi,' has died. His sudden demise has saddened Ganesh devotees. The song, based on Lalbaug Raja's procession, became popular across Maharashtra and will always be remembered.
टॅग्स :संगीतलालबागचा राजामुंबईगणेशोत्सव 2025