शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

भाजपाला अजून एक धक्का, एनडीएमधील आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ

By बाळकृष्ण परब | Published: October 21, 2020 9:10 PM

BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देगोरखा जनमुक्ती मोर्चाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी केली ही घोषणा २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी

नवी दिल्ली - एकीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणातहीभाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)मधील अजून एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) चे नेते बिमल गुरुंग यांनी ही घोषणा केली आहे.गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते बिमल गुरुंग आज अचानकपणे कोलकात्यामध्ये प्रकट झाले. त्यानंतर त्यांनी एनडीए सोडत असल्याची घोषणा केली. तसेच २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कांग्रेससोबत आघाडी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बिमल गुरुंग हे आज कोलकात्यामधील सॉल्ट लेक परिसरातील गोरखा भवनमध्ये दिसले. ते प्रथम गोरखा भवनमध्ये गेले. तिथे बाहेरील लोकांना परवानगी नव्हती. त्यानंतर भाजपाने राज्यासाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला. गोरखालँडसाठी आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत, असे ते म्हणाले.भारतीय जनता पक्षाने जे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता केली नाही. मात्र ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली. त्यामुळे मी स्वत:ला एनडीएपासून वेगळे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बंगालमध्ये गोरख्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे माझ्या पक्षाने एनडीए सोडली आहे, असे त्यांनी सांगितले.२०२१ मध्ये बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवून भाजपाला चोख प्रत्युत्तर देणार आहोत, असेही गुरुंग यांनी सांगितले. दरम्यान, गुरुंग यांच्या या निर्णयानंतर उत्तर बंगालमधील पर्वतीय भागात भाजपाला किमान १० जागांवर फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सध्या सुरूअसलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एलजेपीने एनडीएपासून वेगळे होऊन स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणwest bengalपश्चिम बंगाल