शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

"प्रेमासाठी वाट्टेल ते.."; 'सैराट' मुले-मुली सज्ञान होण्यापूर्वीच ओलांडतात घराचा उंबरठा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 2:59 PM

गेल्यावर्षी अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे तसेच हरविल्याचे, बेपत्ता झाल्याचे ३०६ गुन्हे दाखल झाले होते...

नारायण बडगुजर- पिंपरी : प्रेमासाठी वाट्टेल ते, असे म्हणत काही मुली सज्ञान होण्यापूर्वीच घराचा उंबरठा ओलांडतात. असे ‘सैराट’ असलेले अल्पवयीन मुली व मुले प्रियकर व प्रेयसीसोबत घरातून पळून जात आहेत. कोरोना शिथील होताच त्यात वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे तसेच हरविल्याचे, बेपत्ता झाल्याचे ३०६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ३६ मुले तर १२६ मुली अद्याप मिळून आलेल्या नाहीत. 

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सैराट झालेल्या मुलामुलींची संख्या वाढत आहे. शहर परिसरातूल २०१५ ते २०२० या सहा वर्षांत अल्पवयीन मुली व मुलांच्या अपहरण, हरविल्याचे तसेच बेपत्ता झाल्याच्या २३९२ घटना घडल्या. यात ७९२ मुले तर मुली १६२१ आहेत. तसेच २०१९ मध्ये सर्वाधिक ५१० गुन्हे आहेत. पोलिसांनी तपास करून यातील काही मुली व मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. मात्र काही मुली व मुले अद्याप बेपत्ता आहेत. काहींनी सज्ञान झाल्यानंतर संसार थाटल्याचे समोर आले आहे. मात्र घरच्यांचा विरोध असल्याचे लक्षात येताच अशा अल्पवयीनांकडून धूम ठोकली जात आहे. असे सैराट प्रेमीयुगल विवाहबंधनात अडकल्यानंतरही नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या संपर्कात येत नाहीत. 

अपहरण झालेल्या मुली व मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या आवडीनिवडी, मित्र, त्यांच्या सवयी याबाबत सतर्क राहिले पाहिजे. आवश्यकता असल्यास त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. पोलिसांची मदत घ्यावी.- प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दाखल अपहरण, बेपत्ता झालेले व हरवलेले अल्पवयीन 

            दाखल गुन्हे  -            हरवलेले मुले -मुली -  मिळून न आलेले मुले -मुली२०१५ - ३११- ९८ - २१३- १- ५२०१६ - ३७५ - १५३ - २२२ - ५ - १६२०१७ - ४५० - १३७ - ३१३ - ५- १९२०१८ - ४४० - १४२ - २९८ - ८ -  ३६२०१९ - ५१० - १७४ - ३४३ - २३ - ६४२०२० - ३०६ - ८८ - २३२ - ३६ - १२६

२०२० मध्ये हरविलेली मुले - मुलीजानेवारी - १९ - २२फेब्रुवारी - १६ - ३६मार्च - ८ - १७एप्रिल - ५ - ६मे - ३ - ६जून - ४ - १०जुलै - १ - १५ऑगस्ट - १ - १९सप्टेंबर - ११ - २६ऑक्टोबर - ७ - ३३नोव्हेंबर - १२ - १३डिसेंबर - ७ - २८

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसKidnappingअपहरणrelationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार