शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

शिवरथ यात्रेचे कामशेतमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:58 IST

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते स्वराज्याची राजधा अी रायगड मार्गे निघालेल्या शिवरथ यात्रेचे कामशेत शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले.

कामशेत : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते स्वराज्याची राजधा अी रायगड मार्गे निघालेल्या शिवरथ यात्रेचे कामशेत शहरात मंगळवारी सकाळी आगमन झाले.या वेळी फटाके वाजवून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. तर महिलांनी पालखीत विराजमान छत्रपती शिवाजीमहाराजांच्यामूर्तीला औक्षण करून पालखीचे स्वागत केले. कामशेत पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजीमहाराज चौकापर्यंत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित शिवरथ यात्रेचे कामशेत शहरामध्ये शिवप्रेमी ग्रामस्थांकडून फटाके फोडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराज चौकात मान्यवरांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पोशाखातील महाराजांच्या हस्ते नारळ फोडून मर्दानी खेळाची सुरवात करण्यात आली. लहान मुलामुलींनी दानपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी आदी चित्तथरारक खेळ सादर केले. या वेळी धाडसी खेळकऱ्यांनी डोक्यावर ठेवलेला नारळ काठीच्या साहाय्याने लीलया फोडून आणि एका युवती विरोधात तीन युवकांचे लाठी युद्ध हे विशेष आकर्षणाचा भाग ठरले. तर तरुणाने दानपट्ट्याने रस्त्यावर ठेवलेले लिंबूचे दोन तुकडे करून उपस्थितांची वाहवा मिळवली. मंगळवार कामशेतचा आठवडा बाजार असल्यामुळे चित्तथरारक खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.येथे विविध कार्यक्रम झाल्यानंतर पालखीने पुढे कार्ला मार्गे प्रस्थान केले. गुरुवार (दि. ७) रोजी रायगडावर पोहोचून राजसदरेवर महाभिषेक करून पालखीची जगदीश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढून त्यानंतर भोजन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे माहिती शिवरथ यात्रा उत्सव समितीने दिली.शिवनेरीवरून सुरुवात : कामशेतला स्वागतशिवरथ यात्रेचे ९ वे वर्ष असून, अनेक शिवभक्तांनी या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता. रविवार (दि. ३) रोजी किल्ले शिवनेरीवरून निघालेल्या शिवरथ यात्रा शिवजन्मस्थळ येथे महाभिषेककरून पुढे जुन्नर, कुरण, नारायणगाव, कळंब, मंचर, पिंपळगाव खडकी, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकर वाडी, लोणी, पाबळ, केंदूर, वढू बुद्रुक, फुलगाव, तुळापूर, मरकळ, सोलू, आळंदी, चिखली, मोशी, देहू, सुदुंबरे, भंडारा डोंगर, इंदोरी, माळवाडी, तळेगाव दाभाडे, वडगाव, कान्हे मार्गे कामशेत शहारामध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोहोचली. या वेळी मुला-मुलींनी चित्तथरारक खेळ सादर केले. उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळाली. तसेच त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

टॅग्स :Puneपुणे