पिंपरी : महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे आज मंगळवारी (दि. २८) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से. क्र. २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील स्थापत्यव विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या कामांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २८ एप्रिलला शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.
निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिलला सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून सहकार्य करावे. - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता
Web Summary : Pimpri-Chinchwad residents will experience an evening water supply shutdown on April 28th due to maintenance at the Nigdi water purification center. Morning supply on the 29th will be irregular. Residents are urged to conserve water.
Web Summary : निगडी जल शोधन केंद्र पर रखरखाव के कारण 28 अप्रैल को पिंपरी-चिंचवड के निवासियों को शाम को पानी की आपूर्ति बंद का सामना करना पड़ेगा। 29 तारीख को सुबह की आपूर्ति अनियमित रहेगी। निवासियों से पानी बचाने का आग्रह किया गया है।