शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड

By नारायण बडगुजर | Updated: May 24, 2025 20:31 IST

वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात पितळी किंवा इतर धातूची भांडी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्याऐवजी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती.

पिंपरी : वैष्णवी हगवणे प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी शनिवारी एक कार, दोन पिस्तूल आणि लग्नात दिलेली चांदीची भांडी देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बावधन पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. तसेच वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शशांक आणि सुशील यांच्याकडील दोन पिस्तूल जप्त केले. पुणे शहर पोलिसांकडून या दोघांना पिस्तूल परवाना देण्यात आला होता. त्यामुळे पुणे शहर पोलिसांकडून या दोघांच्या पिस्तूल परवाना जप्तीची नोटीस बजावण्यात आली. 

दरम्यान, बावधन पोलिसांनी याप्रकरणी १७ मे राजी गुन्हा दाखल करून वैष्णवी हिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक केली होती. मात्र, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे दोघेही फरार होते. पोलिसांची सहा पथके त्यांच्या मागावर होती. अखेर बावधन पोलिसांनी शुक्रवारी (दि. २३ मे) पुणे शहरातून राजेंद्र आणि सुशील या पितापुत्राला अटक केली. त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या वाहनांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. यात पोलिसांनी शुक्रवारपर्यंत दोन कार, एक दुचाकी अशी तीन वाहने जप्त केली होती. त्यापाठोपाठ शनिवारी देखील एक कार, चांदीची भांडी, दोन पिस्तूल जप्त केले आहेत. याप्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

 

लग्नात दिली होती चांदीची भांडी

वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात पितळी किंवा इतर धातूची भांडी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्याऐवजी चांदीच्या भांड्यांची मागणी केली होती. त्यानुसार लग्नात चांदीची भांडी दिली, असे वैष्णवीच्या आईवडिलांनी सांगितले होते. पोलिसांनी हीच चांदीची भांडी जप्त केली आहेत.

नीलेश चव्हाणच्या मागावर तीन पथके

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेला नीलेश चव्हाण हा फरार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची तीन पथके त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCrime Newsगुन्हेगारी