लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 11:20 IST2023-07-10T11:20:08+5:302023-07-10T11:20:16+5:30

पाण्याच्या खाणीत तिघे उतरल्यावर पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले असून दोघांचा मृत्यू तर तरुणी बचावली

Two tourists die after drowning in Varsoli mine in Lonavala; The girl survived | लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली

लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली

लोणावळा : वरसोली गावाजवळील खाणीतील पाण्यातून बुडून मुंबईच्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. प्रियांक पानचंद व्होरा (वय ३५, रा. पवई, मुंबई) व विजय सुभाष यादव (वय ३५, रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. 

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सहा जणांचा ग्रुप लोणावळा परिसरात वर्षा विहारासाठी आला होता. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते वरसोली गावातील माळाकडे फिरायला गेले होते. त्याठिकाणी असलेल्या पाण्याच्या खाणीत प्रियांक, विजय व जेनिया वियागस हे तिघे उतरले असता, पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले. त्यावेळी त्यांचे इतर सहकारी व स्थानिकांनी लागलीच त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने प्रियांक व विजय यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शन पोलिस नाईक किशोर पवार करीत आहेत.

Web Title: Two tourists die after drowning in Varsoli mine in Lonavala; The girl survived