वाहन चोरणाऱ्या दोघांना अटक

By Admin | Updated: June 25, 2016 00:27 IST2016-06-25T00:27:37+5:302016-06-25T00:27:37+5:30

निगडी परिसरातून मौजमस्तीसाठी वाहन चोरणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी व एक मोबाइल जप्त केला आहे

Two arrested for stealing a vehicle | वाहन चोरणाऱ्या दोघांना अटक

वाहन चोरणाऱ्या दोघांना अटक

निगडी : निगडी परिसरातून मौजमस्तीसाठी वाहन चोरणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी व एक मोबाइल जप्त केला आहे. याप्रकरणी सुमित ऊर्फ पिंक्या नारायण घुंबरे (वय २२, रा. भीमशक्तीनगर, चिखली, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, दुसरा चोरटा अल्पवयीन आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे दोन चोरटे चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या सूचनेप्रमाणे निगडी पोलिसांनी सापळा रचला आणि दुचाकीवर फिरणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, घुंबरे या चोरट्याने त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने मौजमस्तीसाठी निगडी परिसरातून वाहन चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी व एक मोबाइलदेखील जप्त केला आहे.(वार्ताहर)

Web Title: Two arrested for stealing a vehicle