शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

पिंपरीत गाडी अंगावर घालून भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 2:30 PM

माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले.

ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : चारचाकी मोटारगाडी अंगावर घालून पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरसेविकेचा विनयभंगही केला. निगडी येथील भक्तीशक्ती चौकात शुक्रवारी (दि. 12) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक काळे (वय 57, रा. कृष्णानगर, चिंचवड) व चारचाकी मोटारीचा अनोळखी चालक अशा दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी 47 वर्षीय पीडित नगरसेविकेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नगरसेविका त्यांच्या पतीसह मुलीला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना निगडीतील भक्तीशक्ती चौकात त्यांच्या चारचाकी मोटारीला आरोपींनी मोटारीने कट मारला. त्यानंतर मोटार आडवी लावून फिर्यादीस मोटारीतून खाली उतरायला लावून जबरदस्तीने रस्त्यावर ढकलून दिले.माझ्या मालकाविरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून कानाखाली मारून अश्लील वर्तन केले. तसेच आरोपी अशोक काळे याने मोटारीतून अश्लील इशारे करून 'ये, गाडी घाल त्यांच्यावर ' असे म्हणाला. त्यानंतर अनोळखी आरोपी चालकाने त्याची मोटार फिर्यादीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :nigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपा