धक्कादायक! दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतले स्वतःला पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 18:12 IST2021-08-22T18:12:39+5:302021-08-22T18:12:57+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

Tired of her drunken husband's troubles, the married woman set herself on fire | धक्कादायक! दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतले स्वतःला पेटवून

धक्कादायक! दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतले स्वतःला पेटवून

पिंपरी : लग्न झाल्यापासून दररोज दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेत स्वतःचे जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार निगडी येथे घडला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

संतोष भीमराव गायकवाड (वय २६, रा, ओटास्किम, निगडी), असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २० वर्षीय विवाहितेच्या आईने याप्रकरणी शनिवारी (दि. २१) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या चारित्र्यावर पतीने लग्न झाल्यापासून संशय घेण्यास सुरुवात केली होती. तो दररोज दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असे. दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. तिने स्टोव्हमधील घासलेट अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना १ ऑगस्टला घडली. तर पत्नीचा उपचारादरम्यान १९ ऑगस्टला मृत्यू झाला. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Tired of her drunken husband's troubles, the married woman set herself on fire