अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 14:46 IST2022-08-17T14:27:20+5:302022-08-17T14:46:39+5:30

दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये होते

Thieves crossed the border Donation box from Siddhivinayak temple was stolen | अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली

अरे देवा...! चोरटयांनी हद्दच केली; सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरून नेली

पिंपरी : रावेतमधील सिद्धीविनायक गणेश मंदिरातील दानपोटी अज्ञात चोरट्यांनीचोरून नेली. दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये होते. ही घटना सोमवार (दि.१५) रात्री ११.३० ते मंगळवारी (दि.१६) पहाटे ४.३० च्या दरम्यान घडली. या प्रकरणी धर्मराज मारुती शिंदे (वय ५९, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत गावठाण मधील सिद्धीविनायक गणेश मंदिराचा बंद दरवाज्याचा कडी कोयंदा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मंदिरात ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये होते, असे फिर्यादी नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Thieves crossed the border Donation box from Siddhivinayak temple was stolen